सांगा कुठून येतो रे हे वीर
सांगा कुठून येतो रे हे वीर
सांगा कुठून येतो रे हे वीर,
केवढे धैर्य, केवढा धीर!
तू लढताना सिमेवर,
आठवण येत नाही गावाकडची,
तू झेलताना गोळी छातीवर
भारतमाता हात फिरते का पाठीवर!
सांगा लढताना तुमचे हरवते का भान,
सांगा उरी दाटून येेेतो का अभिमान!!
सांगा कुठून येतो रे हे वीर,
केवढे धैर्य, केवढा धीर!!!
बंदूूक घेताना हातात
तुला भिती नाही का वाटत,
तुझी ताट मान, अन् तुझी चौडी छाती
रोज भारतमाता सांंगते का,
विजयाचा टिळा लाव तुझ्या माथी.
तिथे रणभूमीवर लाल रंंग कुणाचा,
त्या लाल मातीचा ,का तुमच्या सांंडलेल्या
रक्तताचा,
सांगा कुठूू येतो रे हे वीर,
केवढे धैर्य, केवढा धीर!!!
घराघरातून येतो, अन्यायाला कंटाळून
जीवानिशी येेेऊन स्वातंत्र्यासाठी वेळ प्रसंगी आपला जीव गमावतो .
असा हा वीर नव्हे ,महावीर असतो. !!!!!!.
