सांग रे सुखा...
सांग रे सुखा...
1 min
3
सांग रे सुखा तुला काय? हवे ,
एक स्वप्न डोळ्यातले ,
की आयुष्याच्या तडजोडीचे दुवे ...
सांग रे सुखा ...
सांग रे सुखा तुला ही प्रिय आसवे,
गाठले ध्येय पूर्तीतले .,
की तडजोडीचे अध्याय नवे ...
सांग रे सुखा ...
सांग रे सुखा जना मनी समाधान हवे ,
याच पर्यायी दुःख थांबले ,
की तडजोडीने घेतले सवे ...
सां
ग रे सुखा...
सांग रे सुखा आयुष्य म्हणजे तडजोड भावे ,
तुझे थोडेसे माझे थोडेसे ,
एकमेकांत मिसळून घ्यावे ...
सांग रे सुखा ...
