STORYMIRROR

Angulimaal Urade

Others

4  

Angulimaal Urade

Others

सांग ना

सांग ना

1 min
366

सखे एखाद्या नवरीपरी

भासती तुझे रुप गं मला

जीव आतुर तुला बघण्याला

मला भेटावयास कधी येणार

तू आज मला सांग ना !


तुझ्या प्रेमाची रित निराळी

ओठाशी ओठ भिडताना सखे

सर्वस्व येई गं मज्जा

कधी येणार तू वास्तवात

ते आज मला सांग ना !


घेऊनी येणार मी तुला

पैठणी साडी अन् चोळी

आणि बनविणार गं तुला

मी आपली "मार्शल" राणी


साजणी माझ्या नावाचे

कुंकू आपल्या कपाळी

कधी लावणार तू

आज मला सांग ना !


Rate this content
Log in