STORYMIRROR

Manisha Wandhare

Others

3  

Manisha Wandhare

Others

सांग ना मला...

सांग ना मला...

1 min
212

रूप माझं न्याहाळतोस सांग ना मला काय दिसतेय ,

पाहतोस का तो शुभ्र चंद्र सांग ना मला काय दिसतेय ...

ती पिवळी सकाळ कोवळी ओलावणारी दवं अबोली ,

रेशमी मऊशार शलाका सांग ना मला काय दिसतेय ...

रुपेरी वाळूत उन्हाची झळ शुष्क वाऱ्यात तुषार खारा ,

किनारा तू खुणावणारा सांग ना मला काय दिसतेय ...

स्वतःतच गुरफटलेली मी कळून सुद्धा न कळलेली मी ,

बासरीचा सूर तरीही पोकळ सांग ना मला काय दिसतेय ...

ती हिरवी धरणी लता लतिका यांनी सजलेली जलेली मी ,

बंधनात तरी बंधने तोडणारी मी सांग ना मला काय दिसतेय...

प्रकाशमय जग माझे स्पंदनाचा गजर करते मांदियाळी जग ,

या डोळा दर्शन तू ईश्वरी करतेस सांग ना मला काय दिसतेय...

घडविली त्या ईश्वराने तरीही मला पाहता पेचात ब्रह्म पडते ,

काय घडवले मी या सुंदर हाताने सांग ना मला काय दिसतेय...

मी मंद प्रकाश किरणांचा स्मित रहस्यमय धारा बरसणाऱ्या ,

उगम माझा कुठे कधी कसा ना कळते सांग ना मला काय दिसतेय...

तो रंग निळा पिवळा गुलाबी नारंगी त्यावर रंग माझा चढते ,

हरवते मी माझ्यातच तरी तुझ्यात उरते सांग ना मला काय दिसतेय...

त्या तारका पदरात भरूनी ओंजळ रिती आसमंती करते ,

लुकलुकत अंधारातूनही डोकावते सांग ना मला काय दिसतेय...

मी सागराची लाट किनार्‍याला भिडते दुभंगते मागे फिरते,

विरते फेसाळते गोड अभंग होते सांग ना मला काय दिसतेय...


Rate this content
Log in