STORYMIRROR

Shital Kuber

Others

3  

Shital Kuber

Others

सांग माझं ऐकतोय ना

सांग माझं ऐकतोय ना

1 min
173

दुःखाच्या क्षणी सुखाची किंमत तुला कळलीय ना..

आणि वादळाआधीची शांतता तुला माहितीये ना....


आईने भरवलेल्या घासाची किंमत तुला कळतीय ना....

आणि रस्त्यावर उपाशी झोपलेल्या माणसांची स्थिती तुला जाणवते का....


मत मांडताना तुझी घुसमट होते ना...

आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावालाच आहे असं नेहमी वाटतंय ना.....


कलाकाराच्या कलेला दाद तू देतोयस ना..

आणि राग नवा आळवताना वरचा 'सा'लागतोय का......


नवीन लोक पटावर येताना जुने ऋणानुबंध जपतोयस ना.....

आणि रागाच्या पाऱ्यात मित्र तुझा दुरावतोय का.....


हा रंग माझा तो रंग तुझा...धर्माच्या नावाखाली चिरडतोयस का.....

रक्ताचा रंग सारखाच हे तुला माहितीय ना....


स्वतःसाठी जगताना दुसऱ्याचा विचार कधी केलाय का....

आणि चित्रबद्ध होण्यापेक्षा शब्दबद्ध झालाय का.....


शिशिरातल्या हिमात श्वास तुझा गोठलाय का....

आणि श्रावणातल्या पावसात तू मनसोक्त भिजलायस का....


माझं माझं करताना भान तुला राहतेय का....

शेवटी सारी मातीच होणार हे तुला कळतंय ना......शेवटी सारी मातीच होणार हे तुला कळतंय ना


Rate this content
Log in