STORYMIRROR

Asmita prashant Pushpanjali

Others

4  

Asmita prashant Pushpanjali

Others

सांग जरा आज।

सांग जरा आज।

1 min
441

सांग जरा आज, ही झाली सांज वात।

देशील ना सजना तू , जीवनी मला साथ।


बावरू दे मना, धुंद हो साजना

नको अडवूस तू रे, आज भावना।

बघ वारा सुटला, काही कानी बोलला

सांग जरा आज....


भेट ही तर जुनी, दुजा इथ ना कुणी

नभी चांदणी सजली, आज रजनी बहरली

जुगनू कानी बोलला, हित गूज चालला

सांग जरा आज....


ये असा जवळी, सारी रात आपली

हा दुरावा रे का?, मी तुझी प्रीतपाखरा।

झनकार या तना। प्रीतीच्या पैजना

सांग जरा आज...


Rate this content
Log in