STORYMIRROR

शशिकांत राऊत

Others

3  

शशिकांत राऊत

Others

* सांभाळून घेशील ना *

* सांभाळून घेशील ना *

1 min
231

संसाराची दोन चाकं,

साथसंगत नेशील ना,

जरी झालीच मागेपुढे,

सांभाळून घेशील ना...


आयुष्य शिखरावरती,

पोहचण्या देशील ना,

उंच नभी भरारीसाठी,

सांभाळून घेशील ना...


आपुलकीची माणसं,

प्रेमभरे जपशील ना,

मायेच्या पंखाखाली,

सांभाळून घेशील ना...


मुलांच्या प्रगतीसाठी,

ममतेने झटशील ना,

सुखी परीवारासाठी,

सांभाळून घेशील ना...


एकमेकांस सोबतीनं,

जीवनी राहशील ना,

आनंदाच्या संसारात,

सांभाळून घेशील ना...


Rate this content
Log in