STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

3  

Meenakshi Kilawat

Others

सांभाळते नाती पणती

सांभाळते नाती पणती

1 min
267

धुळ सुद्धा पायाला लागु देत नाही

मातीवर कर्तबगार जन्मा येऊनी

घराघरात जाऊनी ती बसते नकळत

अन् सांभाळते नाती पणती होऊनी ।।

किती वर्णावी या मातीची किमया

पोट भरते जनाचे प्रसुत होऊनी

तिच्याच पुण्याईने आपले जगणे मरणे

का तिचेच विस्मरण परकेपणा दाखऊनी?।।

किती पसारा तिच्या अंगावरती

साऱ्या उठाठेवी सहन करूतेय

सदा सहनशिल मौन राहते ती

परंतू प्रेमाने आम्हा कुरवाळतेय ।।

घेई सामावुन मानवाची करनी

तिज सांभाळावे अपुल्या बाळापरी

भेदभाव नसे ना जातीभेद करी

क्षुधा शांतता  वृक्ष लावूनी मातीवरी ।।



Rate this content
Log in