सांभाळ रे बाळा स्वतःला
सांभाळ रे बाळा स्वतःला
हॅलो, आई कशी आहेस?
काही त्रास नाही ना तुला
वृध्दाश्रमाची फी भरली
अॅडव्हान्स सुध्दा दिला
मी खूप सुखात आहे
सांगणारच होते तुला
माझा मुलगा मोठा झाला
हे आजच कळले मला
घरुन निघतांना वाटले होते
माझे कसे होणार बाळा
आजी आजी हाका ऐकून
जीवही कासावीस झाला
खडसावले मी मनाला
हळवी करु नकोस मला
त्यांच्या सुखातच माझे सुख
कसे कळत नाही रे तुला
म्हातारपण मोठा शाप
तेव्हा नेहमीच वाटायचे मला
आठवणींचा उघडताच पेटारा
इथे सारेच होतात गोळा
तरी सांगते बाळा तुला
येऊन भेटत जा रे मला
म्हातारपण मोठे वाईट
सांगून कळायचे नाही तुला
खूप खूप मोठा झाला
आनंदच आहे मला
राहवत नाही म्हणून सांगते
सांभाळ रे बाळा स्वतःला
