STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

सामाजिक विषय...!

सामाजिक विषय...!

1 min
354

(सॅनिटरी नॅपकीन( पॅड )..!

औषधाच्या दुकानात पॅड मागायची

आजवर लाज वाटायची

फाटकी कापड चिंधी मग

पॅड च कर्तव्य पार पडायची....

समज गैरसमजाच्या द्वंद्वात

कौमार्य अवस्था पदार्पण करायची

आपल्याच रक्ताच्या नात्याचीही

तेंव्हा लाज वाटायची....

वाचा असूनही कधी

वाचा फुटायची नाही

आणि नको वाटणारी चिंधी

कधी पाठ सोडायची नाही....


पण आता काळ बदलला

मानसिकता बदलली

फाटक्या कापड चिंधीने

कायमची सुखाने रजा घेतली....

धारीष्ट्याला आता जाग आली

कौमार्य अवस्थेला वाचा फुटली

एक नवी स्वच्छतेची मशाल पेटली

तेंव्हा कोठे चिंधीची जागा पॅड ने घेतली....

चला समाज प्रभोधनाचे जागर घालूया

स्वच्छतेच्या प्रांगणात पाऊल टाकूया

आरोग्य सम्पन्न जीवनाची सुरुवात

नारी सदृढीकरणाने करूया....

सबळ सक्षम आरोग्य सम्पन्न नारी

हीच समृद्ध जीवनाची गुरुकिल्ली

स्वच्छता अभियानाची करून वारी

घरा गल्ली पासून निघूनी गाठू दिल्ली....

स्वच्छ नाही घराची शान

हाच खरा समाजाचा मान

सदृढ सुजाण समाज घडवू छान

राखूण्या उज्वल उन्नत्त देशाचा अभिमान....!



Rate this content
Log in