साज
साज
1 min
421
साज सखे गं तुझा
जीव वेडा होय माझा...
शृंगारतेने नटली तू
सौभाग्याने सजली तू...
गळ्यात सजे बकूळहार
कानी झुमका आयी बहार...
मस्तकी सौभाग्यलंकार
नाकी नथ ती चद्राकार...
हाती लाल हिरवा चुडा
ओठी मस्त रंगला विडा...
दंडात वाकी बाकदार
अंगठी लय झाकदार...
पायी पैंजण रूणझुणले
भाळी कुंकूम छान हसले...
अशी ल्याली सजणी साज
सजणा जाम खूश तीवर आज...
