Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rajesh Sabale

Others

3  

Rajesh Sabale

Others

साईचा महिमा

साईचा महिमा

1 min
291


तुझी एकूण कहाणी, साई शिर्डीस आलो|

तुझा महिमा पाहुनी, साई मनी सुखावलो||धृ||


एकूण रे होतो बाबा, तुझा भोळा भक्ती भाव|

ढोंगी साधू संताशी नाही, कळला तुझा देव||

कोण म्हणे साई तुला, तू रे जातीचा फकीर|

राम रहिम अल्ला सारे, तुझे शक्तीचे भांडार||

जात-पात धर्म-पंथ इथ, सर्व धर्म समभाव|

कोण्या एका जाती-धर्मासाठी, नाही इथ वाव||

म्हणूनच बाबा-साई, तुझ्या दर्शनास आलो||१||


काय नाव गाव तुला, नाही आई-बाप ठाव|

खऱ्या साईच्या सेवेला, नाही कशाचच भ्याव||

गोरगरीब श्रीमंत सारे, साई तुझे नाम घेई|

किती उद्धरले जन, राजे रजवाडे बाबा साई||

दिवा तेल नाही तरी, पाणी दिव्यात पेटले|

पाणी डोळ्यात साठले, भाव मनात दाटले||

चिमटा खणांणता तुझा, भुई अंगार वन्य झालो||२||


मनाचा आधार साई, सुखाचा सागर|

श्रद्धा नी सबुरी, हाच साईचा जागर||

तुझा नाम जप बाबा, राम अल्ला साई|

कबीराच्या दोह्यासंगे, तुका अभंगात गाई||

साईच्या भक्तित लोका, देव दिसे ठाई ठाई|

तुझ्या दर्शनाने बाबा, सारे दुःख सरून जाई।।

म्हणूनच साई तुझ्या, भक्ती रसात न्हालो||३||


Rate this content
Log in