साहित्याचे वारकरी
साहित्याचे वारकरी
1 min
307
साहित्याचे वारकरी आम्ही, सरस्वतीचे नम्र उपासक।
पैशाची नच आम्हां लोलुपता, केवळ आम्ही ज्ञानोपासक॥
साहित्याची घेऊन दिंडी, मार्ग चालतो शारदा दरबारी।
एक मागणे सदैव आमचे , उंच उडो प्रतिभेची भरारी ॥
काव्य, कथा वा कादंबरीचा प्रपंच मांडला सारस्वताचा।
वृत्तालंकार चढवून देवीला, प्रसाद चढवू सात्विकतेचा ॥
रसिकांना तोषवणारे साहित्य करावे निर्माण आपण।
भावभक्तीने वारक-यांच्या , सदैव करावे ते लोकार्पण॥
