साहित्याचे दालन
साहित्याचे दालन
1 min
85
साहित्याच्या दालनात
ठेवले मी पाऊल
आनंदाची मज
लागली चाहूल
शब्दरूपी अलंकाराने
लखलखले झुंबर
कथा ,कविता ,लेखांनी
झगमगले अंबर
विजयी पताका
फडफडती अंगणात
लक्ष दीपमाळा
उजळल्या मनात
सोन्याच्या या दिवशी
जपू मूल्ये सोनेरी
सुख ,समृद्धी येवो
प्रत्येकाच्या घरी
