सागरी किनारा
सागरी किनारा
1 min
11.6K
स्मरणी असे आजही
गावाकडील सागरी किनारा
पांढरी शुभ्र वाळू अन
निखळ पाण्याच्या लाटा
प्रातःकाळीचा नजारा
किती असे मोहक
कोहळ्या उनात भासे
वाळूची वेगळीच चमक
समुद्र किनारी त्या असे
सरूचे सुंदर वन
रम्य ते दृश्य
खुलवी माझे मन
लाटांचा वाळूशी
चाले सुंदर खेळ
त्या वाळूत नाव
कोरण्यात जाई आमचा वेळ
दिवसभराचा थकवा
घालावी तो नजारा
सूर्यास्ताच्या वेळी जेव्हा
सूर्य जाई आपल्या घरा