सागरासारखी एकी
सागरासारखी एकी
1 min
290
जीवनाच्या रंगमंची
आली कुठून लहर
सागराच्या लाटावानी
माजवते एक कहर
सुखी क्षणाची भरती
त्यात दुःखाची आहोटी
भाव तरंग लाटांनी
करी मुक्त ती सचोटी
मनी आतूर आसक्ती
अभिनय साकारला
स्वकियाच्या घोळक्यात
पात्र रंग आकारला....!
सागरा सारखी एकी
आयुष्यात ना पाहिली
होडी आणि किनाऱ्याची
दोस्ती अंतरी राहिली...!
वाऱ्यानेही दिली दिशा
समतोल साधण्याची
पत्यावानी माणसाची
कला थोर जगण्याची....!
संथ वाहणार पाणी
शिकवीते थांबू नये
रंगमंच जीवनाचा
हवा सोबतीस सये....!
