STORYMIRROR

Manisha Awekar

Others

3  

Manisha Awekar

Others

सागर

सागर

1 min
169

लाटांवरी लाटा

उठती तरंग

आनंदाने मन

भिजे चिंब चिंब


अथांग सागर

तळही अतल

पोटामधे भरी

नाना जलचर


सागरा भरती

वेगवान लाटा

प्रेमिकांना ऊत

प्रणयाराधना


बालचमूंनाही

आवडे सागर

लाटांशी खेळती

मोह अनावर


सागर राजाचे

किती उपकार

जलसंपदेचा

दाता दानशूर


साहित्याला गुण द्या
लॉग इन