साधना
साधना
1 min
332
साधना तुझी
करतो गणराया आम्ही
तारावे तुम्ही
आम्हाला.......
आराधना तुमचीच
राहील आमच्या मुखी
ठेवा सुखी
सर्वांना........
विद्येचा देवता
म्हणून स्मरतो तुम्हाला
द्यावी आम्हाला
बुध्दी.....
संकटातून तारनारा
अशी तुमची कीर्ती
रहावी धरती
तेजोमय......
रुप सोज्वळ
किती गोड गोजिरे
मूर्ती साजिरे
बाप्पाचे......
