STORYMIRROR

Pradnya Sonali Dhamal

Others

3  

Pradnya Sonali Dhamal

Others

साडीची गोडी

साडीची गोडी

1 min
570

लहानपणापासूनच मुलींना असते साडीची भलतीच गोडी

ताईची ओढणी गुंडाळून म्हणतात छान माझी साडी


बालवाडीत बालगीतांची गोडी आईने पण शिवली कल्पनासाडी

कल्पनासाडीला नाही कशाची तोड सगळेच म्हणतात राणी दिसते किती गोड


शाळेत गॅदरिंगला घातली कोळीसाडी

शेतकरी गीताला काष्ट्याची साडी

सेंडऑफला साडीची वेगळीच गोडी


साडीबरोबर गळ्यातल्या कानातल्याची आवड भारी

साडीच्या रंगात नटते छान

दादा म्हणतो आई आता हिला छानसं स्थळ आण


तिथून सुरुवात होते लग्नाच्या गोष्टींची

सारखेच येतात पाहुणे रोजचेच झाले साडी नेसणे


लग्नाच्या शालूची वेगळीच नक्षी

काठावर शोभतात मोर आणि पक्षी

माप ओलांडून केला प्रवेश सासरी

साडीची नि माझी मैत्री झाली हसरी


Rate this content
Log in