STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Others

3  

Shobha Sanjay Bavdhankar

Others

साद तुला साथी माझ्या

साद तुला साथी माझ्या

1 min
307

अथांग सागर पसरलेला, 

भेटते त्याला नदी  

नवल वाटते देव आयुष्याचे पान वाढवतो कधी  


आभार मानायचे त्या देवाचे  

जो देव ठेवितो मला सुखी 


घनदाट वृक्षाची छाया दाट 

वाढदिवसाचा नव्याने थाट

आरोग्याची मिळावी देणगी

उदंड आयुष्याची थोरवी


वटवृक्षाला रोज फुटावी फांदी, पारंबी  

पारंबीवर बांधायचा संसाराचा भक्कम झोका  

जिवनात मिळतो नवीन मोका  


सुखसमाधानाची लाभली संधी 

प्रेमाच्या नात्याने ह्रदयात केले बंदी  


या बंदीला असु दे जागा , कुठे नसावी मोकळी 

जिथे तु आहे, तिथे कधीच नाहि रहाणार पोकळी  


भरलेल्या पोकळीत बासरीचे मधुर सुर  

उदंड आयुष्य, सुख समाधान लाभो भरभरुन ॥


Rate this content
Log in