साद मी घातली पण पाहे ना कोणी
साद मी घातली पण पाहे ना कोणी
1 min
235
साद ही घातली
पाहे ना कोणी
एकटीच मी राहिले
सोबत ना कोणी येई
जीवनी माझ्या मी
नाती जोडली बरीच काही
कामास ना कोणी येई
मी मात्र माझी एकटी चाले
ह्या आयुष्याच्या नौकात
माझी मी एकटी विहार करी
त्यात गहिवरले खोल
तरी त्यात मी एकटी बुडाले
आधार मला कोणाचा नव्हता
एकटीचाच हा माझा मार्ग एकला
एकटीनेच सारे सगळे सोसले
एकटीनेच सगळे सावरले
