रयतेचा राजा
रयतेचा राजा
1 min
168
वाटते मनास माझ्या आज
शिवराय पुन्हा अवतरावे
जिजाऊंनी पुन्हा एकदा
छाव्यास जन्माला घालावे
यावे राजांनी पुन्हा एकदा
करावा तोच सर्वत्र पराक्रम
घुमावा नाद चौघड्यांचा
दुमदुमावे शौर्याने नभांगण
घडावा तोच मावळा पुन्हा
स्वराज्यासाठी अखंड झगडणारा
राजांच्या जीवासाठी, स्वतः
प्राण पणाला लावणारा
राजे, तुमच्या येण्याने नक्कीच
बदलेल महाराष्ट्राची दशा
कळून चुकले तरुणाईला
चुकलीय त्यांची दिशा
राजे या पुन्हा नव्याने
आहात तुम्ही आमचे आधार
तुमच्या नसण्याने वाटते आहे
झालोत आम्ही निराधार
