रविवार...!
रविवार...!
रविवार हलकाही फुलकाही...!
र ट्ट्याची रंग रंगुल्या सान सानुल्या
वि सरलेली कवितेची ओळ आठवली
वा ऱ्यासवे मजला ती सकाळी सकाळी
र मणीय शाळेत घेऊन गेली...
ह सलो गालातच उगा मी
ल य साधून तेच तेच गुणगुणताना
का देव जाणे शरमलो मी
ही ला ते आवर्जून सांगताना....
फु सके बार फटाक्यांचे
स स सर सर करीत विझले होते
का रण नसताना ते त्या काळी
ही रीरीने नुसतेच पेटले होते....
आज आठवते ती लवंगी
आज आठवते ती लक्ष्मी
आज आठवतो तो सुतळी बॉम्ब
होतो तेव्हाही आम्ही भोळे सांब....
रविवार आजचा हलका फुलका
करीत होता मनी आठवणींचा गलका
म्हटले त्या आठवणींना बाय बाय
पाहुनी हसत हसत दुधावरची साय....!
