रविवार आगळावेगळा
रविवार आगळावेगळा
आजचा दिन रविवार
विकेंड आहे नेहमीचाच
पण मला बाई हा दिन सुरू
हो जीवाच्या घालमेलीचा...
माझी लेक गर्भार सात मासाची
आली हो बातमी पहाटेच
तिला होतोय त्रास याची
जीव वरखाली माझा नेहमीच...
लेक आहे जयपूरला सध्या
मी आहे पुण्यात राहायला
पुणे जयपूर किती किती लांब
शाळेमुळे वेळही नाही तिकडे जायला...
होतोय खूप त्रास लेकराला
ॲडमीट केले हाॅस्पिटलमधे तिला
इकडे कोणाच्याच जीवात जीव नाही
चैन नाही हो अजिबातच मला...
लेकरू सहन करते माझे एकटेच
तिच्या लेकराची वाट पाहतेय
मी माझ्या लेकरासाठी तरसतीये
आजचा हा असा सुरूवातीचा गेलाय...
दुपारनंतर गोड बातमी आली
नातू झाला आई तुम्हांला
असे वदला भला जावई माझा
आनंद अपार झाला आम्हांला...
आज परत एकदा आज्जी झाले
बाळ जयपूरला मी पुण्याला बाई
आता मात्र मला ओढ लागली बाळाची
त्याला भेटण्याची झाली खूप घाई...
