STORYMIRROR

Pandit Warade

Others

3  

Pandit Warade

Others

रूप ईश्वरी आई

रूप ईश्वरी आई

1 min
140

त्यास लाभते आई ज्याची फळा येते पुण्याई ।

वात्सल्याचा सागर आई, रूप ईश्वरी आई ।।धृ।।


नऊ मास उदरात वागवी, किती कष्ट साहते ।

ढाल बनून ती उभी संकटी बाळापाठी राहते ।।

मातृत्वाची महान पदवी, वाटे तिज नवलाई ।।१।।


तळहाताच्या फोडा प्रमाणे बाळाला ती जपते ।

हाताचा पाळणा अन् दिवा पापणीचाही करते ।।

बाळाला निजवाया नेहमी गाते मधुर अंगाई ।।२।।


आई चरणी झुकवून माथा वंदन कोटी कोटी ।

देवाला प्रार्थना पुन्हा दे जन्म आईच्या पोटी ।। 

तिच्या ऋणातून सांगा कैसे व्हावे मी उतराई ।।३।।


Rate this content
Log in