रुसवा
रुसवा
1 min
322
राधा कोणावर रूसली
का गं यमुनातिरी बसली
गोपिका रुसवा तुझा काढिती
तू कोणाचे ना ऐकती
वेडे हट्ट कसला करशी
तू का बोलेना कृष्णाशी
ऐकून गोपींची बोलणी
राधा उठली गं चिडुनी
मजशी बोलू नका कोणी
काय मिळते मला चिडवुनी
जा येथून साऱ्या जणी
घेते कृष्णाला मी बघुनी
हाक मारी मज पाहुनी
हसतो माठ तो फोडुनी
किती सांगू तुम्हा गाऱ्हाणी
जातायेता मज छेडितो
बासरी गोड वाजवितो
माझा रुसवा क्षणात घालवितो
कसा हा जीव मला लावितो
जीव लावून खोडी करतो
रुसले की मला शोधितो
प्रेम करून मला लाजवितो
माझ्या हृदयी कायम राहतो
मी राधा त्या कृष्णाची
गोपिका सखी त्या राधेची
