STORYMIRROR

Deepa Vankudre

Others

4  

Deepa Vankudre

Others

ऋतूरंग

ऋतूरंग

1 min
297

चक्र अविरत हे फिरते,

किमयागार ऋतू राज!

सृष्टी बहराने नटते ही,

वसंताचा चढतो साज!


कुहूकुहू कोकिळा गाते,

आम्र वृक्ष वनी मोहरतो,

रवि प्रखर तेज झळकत,

ग्रीष्म हा धरणी दाहवतो, 


मळभल्या त्या आसमंती, 

जेव्हा दामिनी लखलखते,

भिजवत चिंब मातीला,

तेव्हा वर्षाराणी बरसते!


शरदाचे खुलता चांदणे, 

दिन उत्सवगीत गाण्याचे,

हेमंताच्या गुलाबी थंडीत,

कुणाची वाट पहाण्याचे!


शिशिराची पानगळ देते,

मधुर क्षणाची आठवण,

गगनाला पतंग भिडणारे, 

सांगती सूर्याचे संक्रमण!


ऋतू येती जाती कितीदा,

प्रकृतीचा नियम परिवर्तन, 

ऋतू रंगात रंगून जगू या,

आनंदी करू या जीवन!


Rate this content
Log in