ऋतू वसंत फुलला...
ऋतू वसंत फुलला...
1 min
475
ऋतू वसंत फुलला
बांधू तोरण घराला
गुढी उभारू दारात
नववस्त्र या गुढीला....
आम्रतरू स्वागताला
बहरला मोहरला
वाट पाहे आनंदाची
धूंद बेधुंद जाहला......
फुटे कंठ कोकिळेला
गाणं तिच्या कंठातून
येई मधुर नाद तो
आमराई वनातून.....
पानोपानी बहरून
आम्रतरू पसरला
कैर्या छानच पाहून
पाणी सुटले तोंडाला.....
किलबिल पक्षी करी
सावलीला सारी आली
घरट्यात पिलांना त्या
चारा भरवू लागली....
