ऋतू प्रेमाचा...
ऋतू प्रेमाचा...
1 min
670
ऋतू प्रेमाचा, हृदय करा विशाल,
प्रेमावर मिळवा विजय, पांघरा प्रेमाची शाल...
ऋतू प्रेमाचा, निरपेक्ष प्रेम करा,
प्रेमाची माध्यमं वेगवेगळी, प्रेम वसू द्या ऊरा...
ऋतू प्रेमाचा, प्रेमच प्रेमळपणा शिकवते,
प्रेमाची क्रियाशीलता, प्रेमाने जागवत राहते...
ऋतू प्रेमाचा, प्रेम विकसित व्हावे,
प्रेमाच्या अंगणात, प्रेमाने न्हावून निघावे...
