ऋतू पावसाळा
ऋतू पावसाळा
1 min
200
पावसाळा ऋतु
बहरली फुले
पाण्यात होड्याही
खेळतात मुले ||१||
शिवारात स्वारी
वर्षा गीत गाते
पावसाची धुन
पोशिंद्याचे नाते ||२||
ऋतू पावसाळा
हवेत गारवा
मृगाचा पाऊस
घुमेही पारवा ||३||
थेंबाचा टपोरा
मोकाटही वारा
दामिनी कडाडे
अंगणात गारा ||४||
इंद्रधनु लपे
पाखरांचा नाद
गुंजे भ्रमरांचा
निसर्गाशी साद ||५||
भिजुनीया चिंब
नववधू नटे
शालू नेसूनही
अंबराला भेटे ||६||
