ऋतू हिरवा हिरवा
ऋतू हिरवा हिरवा
1 min
233
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
*ऋतू हिरवा हिरवा*
*मना उल्हसित करी*
*राजा ऋतूंचा वसंत*
*सॄष्टी बहरली सारी*
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
*होई आनंद साऱ्यांना*
*फुटे झाडांना पालवी*
*नाचू गाऊया तालात*
*चला निसर्ग बोलावी*
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
*थंडी पहाटे बोचरी*
*धुके दाटे चोहीकडे*
*रानी आंबा मोहरला*
*कुहूकुहू कानी पडे*
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
*ऋतू वसंत प्रभावी*
*भरे उमंग उल्हास*
*सारा मोहक देखावा*
*पहा भुलवी जगास*
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
