ऋतू बरवा
ऋतू बरवा
1 min
28.9K
पाचूची बेटेच जणू उगवली...
अवनीच्या रंग महाली...
इवली इवली नाचरी फुलपाखरे...
जणू अवतीभवती रंगबिरंगी स्वप्ने भिरभिरे...
मेघांचा हटता पहारा...
तरूवेलींचा होतो चेहरा हसरा...
नटते लावण्याची सुधा देखणी...
फिरते हिरवाईची भुवरी लेखणी...
फुलाफुलांवर रंग पसरती...
जेव्हा मेघांचे पडदे हटती...
कडेकपारी अलवार झरे वाहती...
पानांआडुन पक्षी न्याहाळीती...
वसुधाही रूपगर्विता चंचला भासे...
नटता मनोहर मनोमन हासे...
तारुण्याचा बहराचा सजतो साज देखणा हिरवा...
पुन्हा पुन्हा बहरतो सृजनाचा ऋतू बरवा...!
