STORYMIRROR

Trupti Naware

Others

3  

Trupti Naware

Others

ऋतुराज वसंत

ऋतुराज वसंत

1 min
174

ग्रीष्माच्या आधीचा शिशिराच्या नंतरचा

फाल्गुनातल्या होळीचा नववर्षाच्या गुढीचा

हा असाच यावा संदेश ऋतुराज वसंताचा

पानझडीच्या वर्षावाचा मनोरथ पल्लवाचा

परिजातकाच्या फुलांचा मोगऱ्याच्या सुगंधाचा

हा असाच राहावा सोहळा ऋतुराज वसंताचा

रंगपंचमीच्या उत्साहाचा चैत्रातल्या स्वप्नील आनंदाचा

वाफळलेल्या सुखद वाऱ्याचा चांदणीच्या शृंगाराचा

हा असाच असावा उत्सव ऋतुराज वसंताचा

प्रियकराच्या ओढीचा कोकीळेच्या गाण्याचा

पहाटेच्या थंडीचा दुपारच्या रखरखत्या उन्हाचा

हा असाच हसावा गंध ऋतुराज वसंताचा

पळसाच्या बहराचा गुलमोहराच्या फुलमोहराचा

बकुळीच्या गंधित फुलाचा कलिंगडाच्या रसाचा

हा असाच स्मरावा ऋतुराज वसंताचा

श्रीरामाच्या जन्माचा छत्रपतीच्या आगमनाचा

आम्रवृक्षाच्या कैरीचा अध्ययनातल्या परीक्षेचा

ग्रीष्माच्या उष्ण चाहुलीचा ऋतुराज वसंत मी कौतुकाचा !!!!!


Rate this content
Log in