STORYMIRROR

Priti Dabade

Others

3  

Priti Dabade

Others

ऋतु पावसाचा

ऋतु पावसाचा

1 min
13

पाऊस

एक आस

मनाला प्रसन्न करणारी

मंत्रमुग्ध करणारा ऋतू खास


पाऊस

खेळी लपंडाव

ऊनसावलीचा मेळ अनोखा

गारवा पसरण्यास मिळे वाव


पाऊस

मोरपिसारा छान

फुलतो नाचत नाचत

दृश्य करी मन प्रसन्न


पाऊस

पडता दिवसरात्र

निसर्गाचे सौंदर्य खुलते

हिरवे गालीचे पसरे सर्वत्र


पाऊस

रस्ता करी

जलमय अन् निसरडा

जलचर हळूच येई पाण्यावरी


पाऊस

नद्या तळे

तुडूंब भरून जाती

भयावह महापूर लोकांसी छळे


Rate this content
Log in