रती मदन
रती मदन
1 min
453
मन्द धुंद हा सुगंध
अम्बरात पुनव चांद
तुझ्याविण नाही सखे
जगी ह्या कुठलाच आनन्द
आहे जरी तुझ्यावर प्रीत
कळली तुझी ती कैफियत
नव्हे बरी ही जनरीत
मिळू दे जरा मग एकांत
वार्या वरी डुले लाल गेंद
त्यावरी पहुडला तो मकरन्द
विहारतो कसा तो स्वछंद
झाली रात राणी बेधुन्द
झाल्या तारका मन्द मन्द
वार्या वर सोडून गंध
दवात भावनांचे सप्तरंग
वसन्त बहार निवांत संग
