रथसप्तमी
रथसप्तमी
1 min
283
सात वारांचे सात घोडे
रथसप्तमीला दुध उतु घाला थोडे
अंगणात करा सडासारवण
घाला सुंदर रंगांची रांगोळी
इवलिशी चुल पेटवुन ठेवा
दुध भरुनी बोळके ठेवा अंगणी
हळद कुंकू फुलं लाल
घालू सुर्यनमस्कार करु ध्यान
माझी पूजा आवडू दे देवा
सगळ्यांचे जीवन प्रकाशमय ठेवा
नको दाखवू कुणाला तिमिर काळी रात्र
तेजस्वी राहू दे सगळ्यांचे राजीवनेत्र
