रस्ता
रस्ता
1 min
401
कुणास ठाऊक कसे झाले
माझे नाते माणसाची तुटले
नाही तो चालण्याचा आवाज
नाही माणसाच्या सुखदुःखाची कुजबुज
नाही वाहनांची रहदारी
नाही वाहनांच्या हाॅनची अरेरावी
सगळं झालंय सामसूम
हे सगळं पाहून मी झालो घामाघूम
मी तुमच्या आजूबाजूचा रस्ता बोलतोय
माझी कहाणी तुम्हाला सांगतोय
कधी कधी वाटे कंटाळा या रहदारीचा
बोलत जाणाऱ्या लोकांचा
पण आज मात्र मी एकटा पडलोय
कोण तरी संवगडी शोधतोय
कोरोनाच संकट लवकर दूर होऊ दे देवा
माणसाच्या रहदारीचा वाटतो आता मला हेवा
