रस्ता
रस्ता
1 min
11.7K
असेल सपाट रस्ता
तर खाव्या लागत नाहीत खस्ता
काळा रस्ता अन् पांढरे पट्टे त्यावर
किती सुंदर दिसतो जणू कविता करावी ह्यावर
तो डांबरचा उग्र वास
रस्ता दुरुस्तीच्या कामाचा लोकांना होतो त्रास
ते घाटातील रस्ते आणि ते वळण
जपून चालवा गाडी टाळा मरण
तो रस्तावर केलेला लांब पल्ल्याचा प्रवास
मनात करून ठेवतो आठवणी खास
चौकस विचारतो हा रस्ता कोठे जातो
तो तेथेच असतो दुसरा हसून म्हणतो