STORYMIRROR

Murari Deshpande

Others

4  

Murari Deshpande

Others

रसिका ....

रसिका ....

1 min
171

मी प्रयत्न करतो केवळ

कोरण्यास काही लेणी

तुम्ही देता सुंदर दाद

ही ना फिटणारी देणी


पाठीवर तुमची थाप

मज मिळता वाटे धन्य

हे कर्जच रसिका मोठे

पण भूषण आहे मान्य


तुमचा नि माझा धागा

हा अतूट आहे आता

मी कृतज्ञतेने स्मरतो

अन टेकवितो हा माथा


ही दहा दिशांशी मैत्री

अन शब्दच बनले दूत

हे बंध रेशमाचे

हे मस्त सुगंधी सूत


जर चुकले माझे काही

तर खुशाल ओढा कान

अधिकार असे हा तुम्हा

तुमचाच असे हा मान


ओलांडून साऱ्या भिंती

धर्माच्या अन जातीच्या

लाभल्या तुम्हासम व्यक्ती

मज मायेच्या मातीच्या


साहित्याला गुण द्या
लॉग इन