रोजच्या धावपळीत
रोजच्या धावपळीत
1 min
306
रोजच्या धावपळीत
जगायचंच राहिलं
मग लक्षात आलं
खूपच काही मागे राहिलं
आज हे करेन उद्या ते
असाच मन विचार करतं
पण मीच नसेन एक दिवस
हेच मला उशिरा कळलं
का मी नाही जगले यथेच्छ?
इतकी वाया घालवली वर्ष
पण ठीक आहे काही नाही
आता कळले हे ही काही थोडे नाही
जे व्हायचे ते तर होईल
जे झाले त्याचे तर गणितचं नाही
जे नाही हातात त्याचा विचार करणे नाही
आणि मिळेल तेवढा आनंद लुटणे थांबणं नाही
