STORYMIRROR

Rohit Khamkar

Others

4  

Rohit Khamkar

Others

रणरागिणी

रणरागिणी

1 min
479

कोणी जाळतोय, कोणी लुटतोय

समाजसेवेचा डंका, आम्ही मोठ्याने कुटतोय


कालचा प्रसंग, आज विसरतोय

रोज नवीन बातमीचा, जणू सरावच करतोय


एकापेक्षा एक भयंकर, भीती नाही कोणाची

शोकसभा आम्ही जाहीर करतो, टांगती तलवार लोकांची


काय म्हणुनी लेक वाचवा, नंतरही मरणार आहे

गर्भापासून जिथे वाट पाहणारा, अंत्यसंस्कार आहे


समानता आली दिसली जाणवली, फक्त कागदावर

जळती लेक जळतच आहे, विस्तव वापरणाऱ्याच्या मनावर


मराठी मातीतल्या रणरागिणी तुम्ही, का म्हणुनी सहन करता

फक्त एकदाच त्या बकासुराचा, कायमचा पाडा फडशा


Rate this content
Log in