रणरागिणी
रणरागिणी
1 min
435
घोड्यावरील रणरागिणी
आज जमिनीवर आली
जगावे कसे याची शिकवण
तिने स्वकर्तुत्वाने दिली
छेडून तार धनुष्याची
स्वर हा गगनी उमटविला
तिच्या त्या रौद्र रुपात
पाहिले महिषासुरमर्दिनीला
ती ना झुकली कधी
ना कुणा झुकावण्या लढली
संस्काराच्या शिकवणी ने
ती आयुष्यभर मढली
बघता अन्याय समाजात
केला तिने सदैव विरोध
ज्याने पाहिले वाकड्या नजरेने
त्याचा घेतला प्रतिशोध
ती बनली कधी राजकुमारी
कधी बनली सर्वांची आई
तिच्या कर्तुत्वाचे आम्ही
आज होऊ कसे उतराई
