STORYMIRROR

Pandit Warade

Others

3  

Pandit Warade

Others

रणरागिणी अहिल्याबाई

रणरागिणी अहिल्याबाई

1 min
420

रणरागिणी अहिल्या

चोंढी गावात जन्मली

मात्र आपल्या शौर्याने

हिंदू स्थानात गाजली


माणकोजी शिंदे बाप

माता सुशिलेच्या पोटी

शूर कन्या जन्म आली

तिला नमस्कार कोटी


होळकर घराण्याची

सून मर्दानी निघाली

पती खंडेराव जाता

राज गादीस ती वाली


 रस्ते, घाट, धर्मशाळा

मंदिरांचा जीर्णोद्धार

धर्म, समाजाभिमुख

चाले राज्य कारभार


अंधश्रद्धा, सतीप्रथा

राज्यातून दूर केल्या

काल बाह्य परंपरा

सर्व मोडीत काढल्या


जन हितासाठी तिने

केले  देहाचे  चंदन

पुण्यश्लोक अहिलेच्या

पायी  त्रिवार  वंदन


Rate this content
Log in