STORYMIRROR

Vineeta Deshpande

Others

4  

Vineeta Deshpande

Others

ऋण

ऋण

1 min
398

हे मानवा तुझा हा जन्म अपाकरण

 मोक्षाची प्राप्ती फेडता हे चारऋण 


निर्मिली ही रम्यसृष्टी तुझ्याकारण 

हे मानवा, करुनी अर्चाना फेड देवऋण


ज्ञानार्जन अधिकार तुझा हे जाण

हे मानवा, करुनी अध्ययन फेड गुरुऋण


कर्तव्य तुझे गृहस्थाश्रमाचे आचरण

हे मानवा, करुनी संतानोत्पत्ती फेड पितृऋण


कर्म ठरविणार किती उज्ज्वल तुझे प्राक्तन  

हे मानवा, परोपकाराकरुन फेड मनुष्यऋण


जन्म ही पहिली पायरी, शेवटची ती मृत्युचा क्षण

सार्थ करोनी हा जन्म, वेच अगणित आनंदाचे कण



Rate this content
Log in