STORYMIRROR

Dilip Yashwant Jane

Others

3  

Dilip Yashwant Jane

Others

ऋण

ऋण

1 min
437

सरिवर सर आली

गेली भिजवून चिंब

ओल ओल्यास मिळाली

फुटे बियाण्यास कोंब


रूप पालटले 'भू' चे

साज हिरवळीचा घेता

झटकली मरगळ

मृग नक्षत्रच येता


शालू हिरवा सृष्टीचा

मोद भरे आसमंती

येई फुलून शिवार

गीत पाखरेही गाती


खेळ उन सावलीचा

शेत शिवारी चालतो

रोप 'बाळ' हे तान्हुलं

सुर्यदेव रे जपतो


इंद्रधनू हे तोरण

सप्तरंगी आभाळात

उभारले उंचावरी

स्वागतास दिमाखात


येता सरीवर सर

पिक आनंदी डोलते

नाळ घट्टच मातीशी

ऋण देवाचे मानते


Rate this content
Log in