Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Suresh Kulkarni

Others

3  

Suresh Kulkarni

Others

ऋण

ऋण

1 min
39

दिलास जन्म तू आई

पोसलेस पोटी तुझ्या 

दिलीस माया 

झालीस छाया

वाढविले केले मज

कणखर बलवान !

बाबा दिला तुम्ही सहारा

ऊन पाऊस वादळवारा

काही न तुम्ही पाहिले

वाढविला जिव्हाळा

दिलीत दिशा दिले शिक्षण

व्यवहारी कुशल मज

तुम्हीच केले !

गुरुजी प्रसंगी तुम्ही

धरिले कान माझे 

धारेवर धरुनि ज्ञान दिले

आणि केलेत उभे मज

माझ्या पायांवर !

भामिनी स्वामिनी

बायको माझी तू 

सदा सुहासिनी

झालीस वेळोवेळी 

प्रिया सखी सचिव

माता भगिनी !

सांभाळीले आधार दिले !

सहोदर सहाध्यायी

झालात स्नेही तुम्ही

घेतलीत काळजी 

खेळता खेळता

शिकविले समजावले

आनंद जीवनाचे !

आहे मी ऋणी 

तुम्हा सर्वांचा

तुम्हीच मला घडवले !

रुजवले वाढविले

समर्थ केले !

Rate this content
Log in