STORYMIRROR

राजेंद्र वैद्य कल्याणकर

Others

3  

राजेंद्र वैद्य कल्याणकर

Others

रंगशोभा

रंगशोभा

1 min
11.4K

रंग रंग रंग किती रंगात रंग मिसळलेले    

अंग तयार माखले डोळ्यातही विरघळले.                     

मोहवितो रंग निळा राधिकेस लावी पिसे.                         

हिरवा तो रंग किती नववधुला शोभतसे   

ठाई ठाई रंग जगी मनात फुलली कमले(१).            


राष्ट्रध्वजा रंग तीन शुभ्र हरित केशरी.

अशोकचक्र शुभ्र निळे महती त्याची न्यारी.

रंगांचे विश्व अजब तयार बुडे त्यास कळे.  (२).


रंग केशरी सकाळ, रंग हळद दुपारी.

श्याम रंग सांजवेळ प्रेमिकास प्रिय भारी.

कृष्णवर्ण प्रिय निशेस तमात प्रेम बहरले (३).


रंगांची रंगसभा रंगांची अनघ प्रभा.

रंगी रंग मिसळता दिसे अनुप शोभा.

सप्तरंगी अंबर जणू आज इथे उतरले(४).


रंग असे जीवनात आयुष्ये बदलतात

रंगांचा जादूने नजराही रंगतात.

रंगहीन जगण्याने जगणेही फिकटले(५).


रंगांची ही दुनिया मयसभाची ही दुसरी.

निळा होत पिवळा रंग लाल दगा करी.

रंग हेचि जुळवितात प्रेम दोन जीवातले(६).


कधी प्रीती कधी नीती रूप रंग बदलती.

रंगांची किमया ही कधी फुलती मरगळती.

रंगांच्या उत्सवात अंगअंग परीमलले.  ७).


रंगांच्या रेशातून साकारत चित्रकला.

शब्दांच्या अंतरात रंग भरी शब्दकला.  

रंगकला, नृत्यकला, रंगांनी जग दिपले(८).                    


Rate this content
Log in