STORYMIRROR

Supriya Devkar

Others

3  

Supriya Devkar

Others

रंगपंचमी

रंगपंचमी

1 min
407

नको धरूस मनात आकस 

नको कोणाचा त्रागा 

सारे आज जाळून टाकू

निर्मळपणे सारे वागा 

होलिकेत दहन करा 

राग लोभ आणि मत्सर 

आनंदी जगण्याचा 

चालू करा नवा स्तर 

रगंपंचमी घेऊन आली 

दारी रंगाची आरास 

रंगानी रंगलेले सारे 

दिसू लागलेत खास 


साहित्याला गुण द्या
लॉग इन