रंगमंच
रंगमंच
जीवनाच्या रंगमंचावर प्रत्येक जण च बजावतोय भूमिका
कोणी पेलतंय बहूपात्री तर कोणाला जबाबदारी शिकवते एकांकिका
इथे आपणच असतो प्रेक्षक आणि आपणच असतो कलाकार
जरी लिखित संवाद नसले तरी बोलताना करावा लागतो सारासार विचार
जन्माला आल्यानंतर मिळालेली भूमिका नकळतच दुसऱ्या भूमिकेत शिरते
मध्यांतराची हि नसते गरज तिला इतक्या सहज ती रंगमंचावर वावरते
इथे नाही मिळत तालीम, तरी सगळेच कसे अगदी तरबेज
दररोजच असतो नवा प्रयोग, सोबत सहकलाकार नवे तर कधी तेच
एक गोष्ट मात्र ठरते खरी, ह्या दोन्हीहि रंगमंचासाठी समान
एक कलाकार पडद्याआड गेला तरी, दुसरा सांभाळतो लगेचच त्याची कमान
इथे मिळत नाही री टेक मग तो असेल करमणुकीचा मंच किंवा जीवनाचा रिऍलिटी शो
मग देऊन न्याय मिळणाऱ्या सगळ्या भूमिकांना बनवा आपला जीवनपटच बेस्ट शो
