STORYMIRROR

Deepa Vankudre

Others

4  

Deepa Vankudre

Others

रंगभूमी

रंगभूमी

1 min
591

जीवन एक रंगभूमी 

असे शेक्सपियर म्हणतो  

आयुष्याचे नाट्य संपता

रंगमंचावर पडदा पडतो!


नाटक हे तीन अंकांचे 

बाल्य, तारुण्य, वार्धक्य 

एखादा अंक आवडला

तरी पुनःसादर अशक्य 


एकदाच मिळते संधी 

करण्यासाठी अभिनय 

कस लागतो सारा तेव्हा 

देण्यास स्व चा परीचय 


ऋणानुबंध कसे कुठे 

सहकलाकार भेटतात 

जवळ येऊन दूर सारतात 

किंवा दूरचे जवळ येतात!


पहिल्या घंटेपासून ते 

पडदा पर्यंतची ही वेळ 

टाळी पडली निसर्गाची,

की आटपतो सारा खेळ!


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍